Thursday, May 2, 2019

अन्न हे पूर्णब्रह्म

स्वयंपाक करायचा प्रचंड कंटाळा आणि बाहेरच चटक मटक खायची इच्छा यामुळे मी जमेल तेंव्हा बाहेर जेवायचां प्लॅन करते.
सुंदर सजावट, चांदण्या सारखे लुकलुकणारे लायटिंग, कृत्रिम का होईना पण मन प्रसन्न करणारी हिरवळ, मस्त काचेच्या भांड्यात सजून येणारे वाफाळलेले पदार्थ. आयते पद्धतशीर वाढणारे वेटर. पाण्याचा ग्लास संपायचा आधीच भरण्याची सेवा. सुख सुख म्हणजे आजुन काय? ना स्वयंपाक करायचा त्रास, ना वाढणे काढणे आणि मुख्य म्हणजे नंतरचे ओटा अवरा, डायनिंग टेबल स्वच्छ करा, उरला सुरला बघा, भांडी अवारा एक ना दोन. रोजच्या धापळीतून एकत्र  कुटुंबात मंडळींना बसून गप्पा मारायला वेळच नसतो. हॉटेल मध्ये कस मस्त नटून थटून photos घेत सगळे छान हसण्या खेळण्यात गप्पा गोष्टी मध्ये दंग होतात. मग एकदोन छान सेल्फिज निघतात.
हेच सुख अनुभवण्यासाठी आजकाल सगळे बाहेर जेवायला पळतात आणि होते काय... हॉटेल बाहेर waitings च्या रांगा वाढत आहेत. १-१ तास थांबून जेवणात लोकांना मज्जा वाटते आहे. वेटींग मुळे कंटाळलेली लहान मुले, वृद्ध माणसे केविलवाणी वाटतात. खाद्य पदार्थ चकचकीत, ज्युसी दिसण्या साठी केलेला तेल ,मसाल्यांचा आणि colours चा अतिरिक्त माऱ्या कडे आपण साफ दुर्लक्ष करतोय.
आईच्या हातची गरम भाकरी , एखादी भाजी ,लोणचं,दही, ताक ह्याची सात्विक चव मी तर miss करतेच आहे पण मला वाईट ह्याचे वाटतंय की माझा मुलगा त्याच्या आईच्या हातचे काही miss करेल, असे काही वाटत नाही कारण लेटेस्ट lifestyle च्या नावाखाली आम्हीच त्याला fast-food chi सवय लावली आहे.

आता  माझ्यावर वेळ आली आहे की आळस झटकून
उठायची आणि जेवण घरीच बनवायची. माझ्या पुढे स्वयंपाक करायचे  दिव्य आहे आणि निल साठी घरचे पदार्थ आत्मसात करायचे अव्हान आहे.
अन्न हे पूर्णब्रह्म हे मुलाला शिकवायच्या आधी मलाच नव्याने शिकायची गरज आहे

बघुया आम्ही दोघं माय लेक ह्यात किती यशस्वी होतो.