Tuesday, June 18, 2019

शाळेचा बुडलेला पहिला दिवस

आजून ही शाळेचे  पहिले  दिवस आठवतात .  नवीन पुस्तकांचा वास, नवीन वह्या.  सगळ्या पुस्तकांना घातलेला छान कव्हर, सुंदर अक्षरांत त्यावर लिहिले नाव. सुस्थित आलेल्या दप्तराला अंघोळ घालून त्याचे रूप पार बदलून जायचे.  कॅमेलिनचा कंपास बॉक्स, त्यातल्या सगळ्यागोष्टी छान आटोपशीर बसवायच्या. रेनॉल्ड पेन पासून सुरूझालेला माझा प्रवास फौंटन , मग पायलट पेन अस होत  होत पार्करच्या इंक पेन पर्यंत मस्त अपग्रडे झाला होता.
निलच्या पुस्तकांना कव्हर घालता घालता मला हे सगळं  आठवून छान वाटतं होत. आणि मग माझ्यातली आई जागी झाली, कारण हे सगळ मी करत असताना चिरंजीवांची नजर  पोगो वरून हालत नव्हती. डोळे  मोठेकरून कपाळावर चार आठ्या आणून मी वरचा सूर लावला, "निsssssssल,  मी इथे सगळं काम करतेय आणि तुझे काय सुरू आहे? मी शाळेला जाणार आहे की  तू ?" बिचार्याच्या लगेच  लक्ष्यात आलं आणि शक्य  तितका गोड  चेहरा करून तो म्हणाला, "पण मम्मा, मला कव्हर नाही ना घालता येत, मी स्टिकरवर नाव लिहू का? "
एक तास भाराच्या खटापटी नंतर आम्ही दोघांनी आपण दमलोय आणि डॅड्डी आजिबात मदत करत नाही आहे म्हणून,  ब्रम्हानंदामध्ये मग्न ( pub-g खेळण्यात )असलेल्या  नवऱ्याची समाधी मोडली. Over the week यूनिफार्म वगैरेची शॉपिंग झाली. यूनिफार्म वॉश करून इस्रीला धाडण्यात आले.सगळे आपापल्या कमला लागले आणि निल शेवटचे ४-५ दिवसात आता परत टीवी बघायला मिळेल नहीं मिळेल म्हणून त्याचा कोटा पूर्ण करून घेत होता. जाता येता आम्ही त्याला ऐकवतच होतो की, आता शाळा सुरु होईल ,टीवी बंद , अभ्यास करायचा वगैरे वगैरे.रोजच्या धावपळीत कधी शाळेचा दिवस जवळ आला कळलच नाही. पूर्वसंध्येला बूट पोलिश झाले , नविन सॉक्स प्लास्टिक ब्याग मधून बाहेर आले, बेल्टचा साइज एडजस्ट झाला , सगळ कस आनंदात सुरु होत. आणि मग सासूबाईंनी विचारल , अग यूनिफार्म दिसले नाहीते . आपण सगळी तयारी केली आहे अस वाटत असतानाच  आता बॉम्ब फुटला ,लक्ष्यात आले की आपण दुकनतुन इस्त्रीचे कपडे आणलेच नाही.
झाल एका पोराची आई होवूनपण  सुनबाईला कही  शिस्त नहीं म्हणून आईनी निशाणा साधला.  "Energy can neither be created nor destroyed" च्या नियमानुसार त्या रागाचा प्रवाह मी नवऱ्याकड़े वळवला , सगळी काही माझी एकटीची जबाबदारी नाही , तू काहीच करत नाहीस अशी सगळी कुरबुर आतून ऐकणाऱ्या सासऱ्यानी सांगितल, आज गुरुवार इस्रीचे दुकान बंद आता फ़ोनकरुन बाघा त्या  भैयाला. मग फ़ोन झाले, उगाच दुकानापर्यन्त चक्कर झाली पण म्हणतात ना दिवस गेला उठाउठी ,चांदण्यांनी तांदूळ लोटी. आता काय ?

आता प्लान बी - 
सकाळी साडे सातला कपड्याचे दुकान उघडलं रे उघडलं की  कपडे आणायचे आणि निलला लगेच  स्कूलला ड्रॉप करायचे. नातवासाठी मॉर्निंग  वॉक सोडून अजोबा दुकानासमोर ठाण मांडून बसले होते.पण आमच्या दुर्दैवाने इस्त्रिवाल्याने दुकान कही लवकर उघडल नाही. एव्हाना व्हाट्स ऍप ग्रुप्स वर "स्कूल चले हम" टैग वाले मुलांचे first day स्पेशल चकाचक यूनिफार्म मधले फोटोजचा  महापुर येवू लागला होता आणि आमचा हिरमूसलेला  चिमुरडा असा बसला होता.

चूक आपलीच आहे,  ती  मान्य केली आणि त्याला पण समजावल की तू पण तुझी  तयारी केली पहिजेस.दुसऱ्या दिवशी मात्र  झाले गेल विसरुन  superman was literally flying तो school