Thursday, January 16, 2020

तो आणि मी, मी आणि तो

आत तो लवकरच येणार हे लक्ष्यात आल्या आल्या मनात लाडूच फुटले. त्याच्या येण्याची कायमच आतुरता असते, किती सुखद असतं त्याचे आस खूप दिवसांनी भेटणे, मीच काय माझे सगळे सखे सोयरे माझ्यासाठी त्याचे एवढे कौतुक करतातना कीं काय  सांगू तुम्हाला.

त्याचे येणं म्हणजे एक सोहळाच, फार दिवस माझ्या संपर्कात नसलेले सुद्धा तो आला की न विसरता जमेल तसं आमचं कौतूक करतात, तसा तो आहेच एकदम स्पेशल. 
त्याचे स्वागत पण जोरदार असते ड्रेस घालू की साडी ???माझी शॉपिंग तर आधीच झालेली असते. गोडा धोडाचे जेवण किती मज्जा . आनंदी आनंद.

पण तो भेटला ना की माझ्या मनाची नेहमी द्विधा अवस्था होते ... माझी माझ्याशीच तुलना सुरू होते
कशी आहे मी आता? मागे होते तशीच दिसते का मी अजून? की मागच्या वेळे पेक्ष्या जरा जाडच झाली आहे. 
वैचारिक पातळीत वाढ झाली आहे की आहे आजून तशीच आहे? छोट्या छोट्या गोष्टी मध्ये इगो कुरवाळत का बसते मी? आणि राग तो तर सेकंदात शूट होतो, पण आता मी नक्की सुधारेन हा. आणि सगळात महत्वाचं नक्की तब्येत सांभाळेन... पिंकी प्रोमिस( मागच्या वेळी पण मी त्याला हेच प्रोमिस केलं होतं) . पण माझा वाढदिवस, इतका चांगला आहे ना की तो नेहमी मला म्हणतो, "माझं परत भेटणे ही एक नवीन संधी म्हणून बघ अणि आपण परत भेटू तेंव्हा  तुझ्या अपडेटेड अँड बेटर व्हर्जन ला भेटू" 

काही वर्षांपूर्वी आजच्या दिवशी घेतलेला पहिला श्वास आणि त्या नंतर दरवर्षी तो आप्तजनांन बरोबर साजरा करायच सुख मिळतंय म्हणून देवाचे खुप खुप आभार. सलेब्रेशनच्या पद्धतीत दरवर्षी बदलत होत आहेत  पण आईच्या हातून औक्षण आणि मोठ्यांचे प्रेमळ आशीर्वाद  माझ्यासाठी लाख मोलाचं आहेत. 

बाकी उतू नये मातु नये, गिफ्ट्स ना कधी नाही म्हणू नये.

तुमची आपली,
स्नेहल