Thursday, January 7, 2021

लोटांगण : एक अनुभूती

आगदी कळतय तेंव्हापासुन ताला सुरात,डोळे बंद करुन आरती म्हणतेय... आरती म्हणायची आणि शेवटी प्रार्थना
              घालीन लोटांगण, वंदीनचरण।
              डोळ्यांनीपाहीनरुपतुझें।
 हे म्हणताना स्वत: भोवती गिरकी घ्यायची. हे सगळ यंत्रावत घडत, घडत आलय आणि घडेल. पण "घालीन लोटांगण" म्हणजे प्रदक्षिणाच असे मला  वाटायचे. लोटांगणाचा खरा अर्थ कधी समजून घेण्याची वेळ आलीच नाही.  अकरा वर्षापूर्वी जेंव्हा लग्न झाल,तेंव्हा कळाले की सासरी (कुडाळ, सातारा) लग्नानंतर ग्राम देवाला नावर्यामुुलाच्या आईने म्हंणजे वरमाई ने किंवा घरच्या स्त्रीने लोटांगण घेण्याची प्रथा आहे.

देवाला नवस बोलून दंडवत घालणारे मी बघितले होते आगदी कैलास पर्वताला पण साष्टांग नमस्कार घालायचे उठायचे परत साष्टांग नमस्कार आशी प्रदक्षिणा पुर्ण करणारी भक्तमंडळी कमी नाहीत. पण लोटांगण म्हणजे पुर्ण जामिनीवर झोपून स्वतःभोवती लोळण घेत देवाची प्रदक्षिणा पुर्ण करणे. आमच्या लग्नात चुलत सासुबाईंनी घेतलेल लोटांगण म्हंणजे माझा पहिलाच अनुभव होता. नवी नवरी आसताना शोभा काकूंनी घेतलेले लोटांगण बघून, आपल्यासाठी कुणी असे कष्ट घेत आहेत, हे बघुन मनात एक कृतज्ञता, आदर होता. जेंव्हा केंव्हा देव आपल्याला संधी देईल तेंव्हा आपण पण लोटांगण  घेऊ हे माझ पक्क होत. 

मागच्या महिन्यात संकेत म्हणजे माझ्या चुलत दीराचे लग्न झाल. आणि वैशाली काकूंनी मला विचारल की तू लोटांगण घेशील का? नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता पण आपल्याला जमेल का? ही शंका होती. शोभा काकूंनी घेतलेल लोटांगण धुसरसे आठवत होत. जेव्हा मी लोटांगण घेणार आहे, हे माझ्या माहेरी कळाले  तेंव्हा सगळेच खुप काळजीत होते. करोनाची पार्श्वभूमी, गावाकडची थंडी अणि माझी नाजुक तब्येतीमूळे  सगळे खुप काळजी करत होते पण माझा निर्णय पक्का आहे हे बघून मग सगळ्यांनी मला सपोर्ट करायला सुरुवात केली. 

दादा घरी प्रक्टिस कर म्हणाला आणि मी अतीउत्साह दाखवत घरातच लोळण घेतले... घरच्या smooth floor  वर जरी मस्त लोळण घेतले तरी कोपर,ढोपर अणि गुढगे कमालीचे दुखावले. लक्ष्यात आल की प्रकरण येवढेपण सोप्पे नही. 
मग सुरु झाल्या सगळ्यांच्या कळजीमय  सुचना , 
आई म्हणाली  तू जाड साडी नेस म्हणजे तुला काही टोचणार नाही 
बाबा म्हणाले तू kneecap अणि elbow protector  घाल.
पप्पांनी (सासरे) मंदिरात सतरंज्या घालायची तयारी दाखवली.
निशीने जोडीने लोटांगण घेऊया आसे सुचवाल, म्हणजे जर काही त्रास झाला तर दोघे मिळून सोसूया ही त्याची भावना होती.

सगळ्यांना माझी वाटणारी काळजी मला कळत होती पण करायचे तर जसे गावाकडे बाकीचे लोक करतात तसे करायचे, त्यात स्वताःच्या सोईसाठी कुठलाही बदल करायचा नाही आणि देव सगळ सांभाळून घेईलच हा विश्वास होता.
मग देवाला साकड घातल, मनापासुन प्रार्थना केली की आता तू सगळ संभाळून घे.

मनाची तयारी केली आसली तरी ऐनवेळ पोटात गोळा आला होताच. सगळ्या थोरांचे आशिर्वाद घेउंन, जसे जसे संगितल तस उपास, मौन पाळल. आता देवावर सगळ सोडून दिले होत.

गळ्यात हार घालून घ्यायला जरा अवघड्ल्यासारखे वाटत होत पण आता मौन सुरु होत, बोलू शकत नव्हते की मागे वळून बघणे शक्य नाही. तरी बर करोनामूळे वाजंत्री व गर्दीला फाटा दिला होता. 


मला वाटत होत की स्वत:च सगळ करायचे आहे, पण सगळा महिलवर्ग बरोबर होता. त्यानी घेतलेल्या कळजीमूळे सगळ फार सोपे झाल. आगदी फूला सारख जपून, गरज आसेल तिथे मला उचलून ठेवून त्यानी प्रदक्षिणापूर्ण करायला मोलाची मदत केली.त्या सर्वांचेच मनापासून आभार.

गावाकडच्या प्रथा,रुढी जरी अवघड असल्या आणि आत्ताच्या  काळात त्यावर विश्वास ठेवावा की नाही आसे वाटत आसताना त्या मागची भावना समजून घेणे महत्वाचे.
पाया पडणं, साष्टांग नमस्कार घालणं म्हणजे मनोभावे शरण जाणं, स्वाधीन होणं, सर्वस्व अर्पण करणं. आणि तेंव्हाच खरी मी- तूपणाची जाणीव नष्ट होते. हा अनुभव खुप वेगळा आणि चिरकाळ स्मरणात राहील.

~स्नेहल