Wednesday, February 5, 2020
नील आर्मस्ट्रॉंग
Thursday, January 16, 2020
तो आणि मी, मी आणि तो
Saturday, November 9, 2019
This Kid is difficult to handle
It was a sunday morning and I was forcing Neel to read his science book
ME: Neel are you able to follow the chapter? Do you need my help?
Neel: Science is easy mamma, I am difficult to handle
Me: Waahaat? Where did you get this dialogue from?
Neel: you only keep saying this kid is difficult to handle, I don't listen to you so I said so;-)
Saturday, November 2, 2019
मदर इंडिया
नील: ममा तू काय बोलली? which word did you say?
मी: माझ्यातली वैतागलेली महिला पेटून उठली,मी म्हणाले आधी आई बाबानी मला कंट्रोल केलं, मग सासू सासरे आता तू पण मला कंट्रोल करतोय. please leave me alone and let me live my life peacefully.
नील: If I leave you , who will take care of me?
मी: you just stop controlling me, that's none of your business
नील: Getting angry , It is other way, you too stop controlling me, it is none of your business too
मी: See Neel , till you become 18 years old, you are totally my business. Then I will let you go wherever you want
नील: अर्ये पण मी तुला सोडून कुठे जाणारच नाही. मग तू अजेसासरा कुणाला म्हणणार?
मदर इंडियाचा उर भरून यायला हे निमित्त खूप झालं नाही?
Monday, September 16, 2019
सुंदर दिसण्याचा हट्ट
Tuesday, June 18, 2019
शाळेचा बुडलेला पहिला दिवस
एक तास भाराच्या खटापटी नंतर आम्ही दोघांनी आपण दमलोय आणि डॅड्डी आजिबात मदत करत नाही आहे म्हणून, ब्रम्हानंदामध्ये मग्न ( pub-g खेळण्यात )असलेल्या नवऱ्याची समाधी मोडली. Over the week यूनिफार्म वगैरेची शॉपिंग झाली. यूनिफार्म वॉश करून इस्रीला धाडण्यात आले.सगळे आपापल्या कमला लागले आणि निल शेवटचे ४-५ दिवसात आता परत टीवी बघायला मिळेल नहीं मिळेल म्हणून त्याचा कोटा पूर्ण करून घेत होता. जाता येता आम्ही त्याला ऐकवतच होतो की, आता शाळा सुरु होईल ,टीवी बंद , अभ्यास करायचा वगैरे वगैरे.रोजच्या धावपळीत कधी शाळेचा दिवस जवळ आला कळलच नाही. पूर्वसंध्येला बूट पोलिश झाले , नविन सॉक्स प्लास्टिक ब्याग मधून बाहेर आले, बेल्टचा साइज एडजस्ट झाला , सगळ कस आनंदात सुरु होत. आणि मग सासूबाईंनी विचारल , अग यूनिफार्म दिसले नाहीते . आपण सगळी तयारी केली आहे अस वाटत असतानाच आता बॉम्ब फुटला ,लक्ष्यात आले की आपण दुकनतुन इस्त्रीचे कपडे आणलेच नाही.
आता प्लान बी -
सकाळी साडे सातला कपड्याचे दुकान उघडलं रे उघडलं की कपडे आणायचे आणि निलला लगेच स्कूलला ड्रॉप करायचे. नातवासाठी मॉर्निंग वॉक सोडून अजोबा दुकानासमोर ठाण मांडून बसले होते.पण आमच्या दुर्दैवाने इस्त्रिवाल्याने दुकान कही लवकर उघडल नाही. एव्हाना व्हाट्स ऍप ग्रुप्स वर "स्कूल चले हम" टैग वाले मुलांचे first day स्पेशल चकाचक यूनिफार्म मधले फोटोजचा महापुर येवू लागला होता आणि आमचा हिरमूसलेला चिमुरडा असा बसला होता.
Thursday, May 2, 2019
अन्न हे पूर्णब्रह्म
स्वयंपाक करायचा प्रचंड कंटाळा आणि बाहेरच चटक मटक खायची इच्छा यामुळे मी जमेल तेंव्हा बाहेर जेवायचां प्लॅन करते.
सुंदर सजावट, चांदण्या सारखे लुकलुकणारे लायटिंग, कृत्रिम का होईना पण मन प्रसन्न करणारी हिरवळ, मस्त काचेच्या भांड्यात सजून येणारे वाफाळलेले पदार्थ. आयते पद्धतशीर वाढणारे वेटर. पाण्याचा ग्लास संपायचा आधीच भरण्याची सेवा. सुख सुख म्हणजे आजुन काय? ना स्वयंपाक करायचा त्रास, ना वाढणे काढणे आणि मुख्य म्हणजे नंतरचे ओटा अवरा, डायनिंग टेबल स्वच्छ करा, उरला सुरला बघा, भांडी अवारा एक ना दोन. रोजच्या धापळीतून एकत्र कुटुंबात मंडळींना बसून गप्पा मारायला वेळच नसतो. हॉटेल मध्ये कस मस्त नटून थटून photos घेत सगळे छान हसण्या खेळण्यात गप्पा गोष्टी मध्ये दंग होतात. मग एकदोन छान सेल्फिज निघतात.
हेच सुख अनुभवण्यासाठी आजकाल सगळे बाहेर जेवायला पळतात आणि होते काय... हॉटेल बाहेर waitings च्या रांगा वाढत आहेत. १-१ तास थांबून जेवणात लोकांना मज्जा वाटते आहे. वेटींग मुळे कंटाळलेली लहान मुले, वृद्ध माणसे केविलवाणी वाटतात. खाद्य पदार्थ चकचकीत, ज्युसी दिसण्या साठी केलेला तेल ,मसाल्यांचा आणि colours चा अतिरिक्त माऱ्या कडे आपण साफ दुर्लक्ष करतोय.
आईच्या हातची गरम भाकरी , एखादी भाजी ,लोणचं,दही, ताक ह्याची सात्विक चव मी तर miss करतेच आहे पण मला वाईट ह्याचे वाटतंय की माझा मुलगा त्याच्या आईच्या हातचे काही miss करेल, असे काही वाटत नाही कारण लेटेस्ट lifestyle च्या नावाखाली आम्हीच त्याला fast-food chi सवय लावली आहे.
आता माझ्यावर वेळ आली आहे की आळस झटकून
उठायची आणि जेवण घरीच बनवायची. माझ्या पुढे स्वयंपाक करायचे दिव्य आहे आणि निल साठी घरचे पदार्थ आत्मसात करायचे अव्हान आहे.
अन्न हे पूर्णब्रह्म हे मुलाला शिकवायच्या आधी मलाच नव्याने शिकायची गरज आहे
बघुया आम्ही दोघं माय लेक ह्यात किती यशस्वी होतो.

