Sunday, October 31, 2021

भावनाओं को समझो

सकाळी कामाच्या गडबडीत दूध उतू गेल. ओट्यावर पसरलेला अथांग दूधसागर बघून मला रडू, स्वतःचीच चिड, काम वाढले म्हणून वैताग आला होता. 

माझा रडका आवाज ऐकून माझ पिल्लू पळत आले.

नील: मम्मा  don't be sad, दूध उतू जाणे *शुभ्र* असते.

मी: काय?

नील : sorry sorry... दूध उतू जाणे *शुध्द* असते. 

मी : 🤦‍♀️🤦‍♀️   तूला *शुभ* म्हणायच का??

नील: yeees शुभ आहे  हे आणि आपल्या कडे खूप दूध आहे.  Why to be sad??

दूध वाया जायचे दुःख नाही पण गॅस, ओटा स्वच्छ करायच त्रास आणि मनस्ताप जास्त होतो. 

दुःखी आईच्या सांत्वनाचा त्याचा प्रयत्न मात्र सुखद होता🤗

Friday, October 8, 2021

मेरी माँ

~मेरी माँ~
वाढदिवसाचे अभिष्टचिंतन #2020

मला का माहित नाही पण आज पारगाव मधली (१९९२) आई आठवते. तरुण,उत्साही. मी मोठी होत गेले आणि आई कधी म्हातारी होत गेली ते कळलच नही. आज आईचा  ६०वा वाढदिवसाच्या आहे. आतीकष्ट आणि नाजुक तब्येत यामुळे वयाच्या खुप आधिच तुला वार्धक्य आलय खर. आता नवीन सुरु होणारे उत्तरायण तू स्वतः साठी जग आसेही म्हणू शकत नाही कारण त्याची तुला सवयच नाही. पण तब्यतेची कळजी घेत,आमच्या चिंता कमी करुन ,ज्यास्त देव देव न करता नातवंडांन बरोबर मज्जेत घालव. 
तुला काही द्यायची माझी योग्यता नाही अणि तुला कश्याचा  मोह पण नाही. म्हणून मीच मागते खुप हट्टाने ठरवलेली आपली ट्रिप झालीच नही पण भविष्यात कधी योग आलाच तर तू नाही म्हणायचे नाही. मला तुझ्या बरोबर फिरायच आहे.
लवकर भेटू. 

बाप माणुस

"बाप माणुस"
पितृ दिनाचे अवचित साधून.....
"तू ठोक, मी आहे निस्तरायला" बाबांनच्या "मी आहे" ह्या आश्वासक डायलॉग मूळे कार चालवायचा मी पुनश:
हरी ओंम करु शकले आहे. 
आई माझ्यासाठी सर्वस्व पण बाबांना मात्र कायम गृहित धरलेल.एकदा मी बोलूनपण गेले होते की, तूम्ही पैसे कमावले पण आई खुप झटली आहे आमच्यासाठी. चुकल होत माझ तेंव्हा. आमच्यासाठी येवढ्या लांब राहून घर चालवणार्या बाबां चा त्याग मी विसरले होते. 

मी घरीयेणार म्हंटल की घडाळ्याच्या काट्याला न बघता रात्री अपरात्री घायला पोचवायला तूम्ही कायंम हजर. 
आज मी जी आहे ते तुमच्या मूळे. तुमच्या सहज वागण्यातून तूम्ही आमच्यावर किती छान संस्कार केले आहेत.
आपला हात कायम देणाराच असला पाहिजे। 
काम करायचे तर ते १००% देवून करायचे।
मातृप्रेम, भावा बहिणीन वरचे निरपेक्ष प्रेम। 
चांगले अक्षर, चित्रकला, हे सगळे गुण तुमच्याच कडून तर मिळाले आहेत. 

"तुझा नंबर येणार नाही, तर मग कुणाचा येणार?" तुमचा हा विश्वास मला सगळ्या परीक्षांमध्ये खुप पुढे घेऊन गेला.

तुमच्या जिवावर मी खुप माज केलाय आणि मज्जेत जगलेय.
 एका मुलाची आई झाले तरी, तुमच्या मोबाइल वरचा  'राणू बाळ' म्हणून आसणारा माझा नंबर मला सुखावून जातो. इंग्रांजीत "I love you, baba" अस म्हंटल तर, ते तुम्हाला   डायजेस्ट होणार नाही  पण तूम्ही माझे बाबा आसल्यचा मला खुप अभिमान आहे. काहीही करुन मातृ-पितृ ऋणातून मोकळे होणे शक्य नाही,खर तर त्या ऋणात राहण्यतच मोठा आनंद आणि सुखं आहे.

~स्नेहल