~मेरी माँ~
वाढदिवसाचे अभिष्टचिंतन #2020
मला का माहित नाही पण आज पारगाव मधली (१९९२) आई आठवते. तरुण,उत्साही. मी मोठी होत गेले आणि आई कधी म्हातारी होत गेली ते कळलच नही. आज आईचा ६०वा वाढदिवसाच्या आहे. आतीकष्ट आणि नाजुक तब्येत यामुळे वयाच्या खुप आधिच तुला वार्धक्य आलय खर. आता नवीन सुरु होणारे उत्तरायण तू स्वतः साठी जग आसेही म्हणू शकत नाही कारण त्याची तुला सवयच नाही. पण तब्यतेची कळजी घेत,आमच्या चिंता कमी करुन ,ज्यास्त देव देव न करता नातवंडांन बरोबर मज्जेत घालव.
तुला काही द्यायची माझी योग्यता नाही अणि तुला कश्याचा मोह पण नाही. म्हणून मीच मागते खुप हट्टाने ठरवलेली आपली ट्रिप झालीच नही पण भविष्यात कधी योग आलाच तर तू नाही म्हणायचे नाही. मला तुझ्या बरोबर फिरायच आहे.
लवकर भेटू.
No comments:
Post a Comment