सकाळी कामाच्या गडबडीत दूध उतू गेल. ओट्यावर पसरलेला अथांग दूधसागर बघून मला रडू, स्वतःचीच चिड, काम वाढले म्हणून वैताग आला होता.
माझा रडका आवाज ऐकून माझ पिल्लू पळत आले.
नील: मम्मा don't be sad, दूध उतू जाणे *शुभ्र* असते.
मी: काय?
नील : sorry sorry... दूध उतू जाणे *शुध्द* असते.
मी : 🤦♀️🤦♀️ तूला *शुभ* म्हणायच का??
नील: yeees शुभ आहे हे आणि आपल्या कडे खूप दूध आहे. Why to be sad??
दूध वाया जायचे दुःख नाही पण गॅस, ओटा स्वच्छ करायच त्रास आणि मनस्ताप जास्त होतो.
दुःखी आईच्या सांत्वनाचा त्याचा प्रयत्न मात्र सुखद होता🤗
No comments:
Post a Comment