Friday, October 8, 2021

बाप माणुस

"बाप माणुस"
पितृ दिनाचे अवचित साधून.....
"तू ठोक, मी आहे निस्तरायला" बाबांनच्या "मी आहे" ह्या आश्वासक डायलॉग मूळे कार चालवायचा मी पुनश:
हरी ओंम करु शकले आहे. 
आई माझ्यासाठी सर्वस्व पण बाबांना मात्र कायम गृहित धरलेल.एकदा मी बोलूनपण गेले होते की, तूम्ही पैसे कमावले पण आई खुप झटली आहे आमच्यासाठी. चुकल होत माझ तेंव्हा. आमच्यासाठी येवढ्या लांब राहून घर चालवणार्या बाबां चा त्याग मी विसरले होते. 

मी घरीयेणार म्हंटल की घडाळ्याच्या काट्याला न बघता रात्री अपरात्री घायला पोचवायला तूम्ही कायंम हजर. 
आज मी जी आहे ते तुमच्या मूळे. तुमच्या सहज वागण्यातून तूम्ही आमच्यावर किती छान संस्कार केले आहेत.
आपला हात कायम देणाराच असला पाहिजे। 
काम करायचे तर ते १००% देवून करायचे।
मातृप्रेम, भावा बहिणीन वरचे निरपेक्ष प्रेम। 
चांगले अक्षर, चित्रकला, हे सगळे गुण तुमच्याच कडून तर मिळाले आहेत. 

"तुझा नंबर येणार नाही, तर मग कुणाचा येणार?" तुमचा हा विश्वास मला सगळ्या परीक्षांमध्ये खुप पुढे घेऊन गेला.

तुमच्या जिवावर मी खुप माज केलाय आणि मज्जेत जगलेय.
 एका मुलाची आई झाले तरी, तुमच्या मोबाइल वरचा  'राणू बाळ' म्हणून आसणारा माझा नंबर मला सुखावून जातो. इंग्रांजीत "I love you, baba" अस म्हंटल तर, ते तुम्हाला   डायजेस्ट होणार नाही  पण तूम्ही माझे बाबा आसल्यचा मला खुप अभिमान आहे. काहीही करुन मातृ-पितृ ऋणातून मोकळे होणे शक्य नाही,खर तर त्या ऋणात राहण्यतच मोठा आनंद आणि सुखं आहे.

~स्नेहल

No comments: