Friday, October 8, 2021

मेरी माँ

~मेरी माँ~
वाढदिवसाचे अभिष्टचिंतन #2020

मला का माहित नाही पण आज पारगाव मधली (१९९२) आई आठवते. तरुण,उत्साही. मी मोठी होत गेले आणि आई कधी म्हातारी होत गेली ते कळलच नही. आज आईचा  ६०वा वाढदिवसाच्या आहे. आतीकष्ट आणि नाजुक तब्येत यामुळे वयाच्या खुप आधिच तुला वार्धक्य आलय खर. आता नवीन सुरु होणारे उत्तरायण तू स्वतः साठी जग आसेही म्हणू शकत नाही कारण त्याची तुला सवयच नाही. पण तब्यतेची कळजी घेत,आमच्या चिंता कमी करुन ,ज्यास्त देव देव न करता नातवंडांन बरोबर मज्जेत घालव. 
तुला काही द्यायची माझी योग्यता नाही अणि तुला कश्याचा  मोह पण नाही. म्हणून मीच मागते खुप हट्टाने ठरवलेली आपली ट्रिप झालीच नही पण भविष्यात कधी योग आलाच तर तू नाही म्हणायचे नाही. मला तुझ्या बरोबर फिरायच आहे.
लवकर भेटू. 

बाप माणुस

"बाप माणुस"
पितृ दिनाचे अवचित साधून.....
"तू ठोक, मी आहे निस्तरायला" बाबांनच्या "मी आहे" ह्या आश्वासक डायलॉग मूळे कार चालवायचा मी पुनश:
हरी ओंम करु शकले आहे. 
आई माझ्यासाठी सर्वस्व पण बाबांना मात्र कायम गृहित धरलेल.एकदा मी बोलूनपण गेले होते की, तूम्ही पैसे कमावले पण आई खुप झटली आहे आमच्यासाठी. चुकल होत माझ तेंव्हा. आमच्यासाठी येवढ्या लांब राहून घर चालवणार्या बाबां चा त्याग मी विसरले होते. 

मी घरीयेणार म्हंटल की घडाळ्याच्या काट्याला न बघता रात्री अपरात्री घायला पोचवायला तूम्ही कायंम हजर. 
आज मी जी आहे ते तुमच्या मूळे. तुमच्या सहज वागण्यातून तूम्ही आमच्यावर किती छान संस्कार केले आहेत.
आपला हात कायम देणाराच असला पाहिजे। 
काम करायचे तर ते १००% देवून करायचे।
मातृप्रेम, भावा बहिणीन वरचे निरपेक्ष प्रेम। 
चांगले अक्षर, चित्रकला, हे सगळे गुण तुमच्याच कडून तर मिळाले आहेत. 

"तुझा नंबर येणार नाही, तर मग कुणाचा येणार?" तुमचा हा विश्वास मला सगळ्या परीक्षांमध्ये खुप पुढे घेऊन गेला.

तुमच्या जिवावर मी खुप माज केलाय आणि मज्जेत जगलेय.
 एका मुलाची आई झाले तरी, तुमच्या मोबाइल वरचा  'राणू बाळ' म्हणून आसणारा माझा नंबर मला सुखावून जातो. इंग्रांजीत "I love you, baba" अस म्हंटल तर, ते तुम्हाला   डायजेस्ट होणार नाही  पण तूम्ही माझे बाबा आसल्यचा मला खुप अभिमान आहे. काहीही करुन मातृ-पितृ ऋणातून मोकळे होणे शक्य नाही,खर तर त्या ऋणात राहण्यतच मोठा आनंद आणि सुखं आहे.

~स्नेहल

Thursday, January 7, 2021

लोटांगण : एक अनुभूती

आगदी कळतय तेंव्हापासुन ताला सुरात,डोळे बंद करुन आरती म्हणतेय... आरती म्हणायची आणि शेवटी प्रार्थना
              घालीन लोटांगण, वंदीनचरण।
              डोळ्यांनीपाहीनरुपतुझें।
 हे म्हणताना स्वत: भोवती गिरकी घ्यायची. हे सगळ यंत्रावत घडत, घडत आलय आणि घडेल. पण "घालीन लोटांगण" म्हणजे प्रदक्षिणाच असे मला  वाटायचे. लोटांगणाचा खरा अर्थ कधी समजून घेण्याची वेळ आलीच नाही.  अकरा वर्षापूर्वी जेंव्हा लग्न झाल,तेंव्हा कळाले की सासरी (कुडाळ, सातारा) लग्नानंतर ग्राम देवाला नावर्यामुुलाच्या आईने म्हंणजे वरमाई ने किंवा घरच्या स्त्रीने लोटांगण घेण्याची प्रथा आहे.

देवाला नवस बोलून दंडवत घालणारे मी बघितले होते आगदी कैलास पर्वताला पण साष्टांग नमस्कार घालायचे उठायचे परत साष्टांग नमस्कार आशी प्रदक्षिणा पुर्ण करणारी भक्तमंडळी कमी नाहीत. पण लोटांगण म्हणजे पुर्ण जामिनीवर झोपून स्वतःभोवती लोळण घेत देवाची प्रदक्षिणा पुर्ण करणे. आमच्या लग्नात चुलत सासुबाईंनी घेतलेल लोटांगण म्हंणजे माझा पहिलाच अनुभव होता. नवी नवरी आसताना शोभा काकूंनी घेतलेले लोटांगण बघून, आपल्यासाठी कुणी असे कष्ट घेत आहेत, हे बघुन मनात एक कृतज्ञता, आदर होता. जेंव्हा केंव्हा देव आपल्याला संधी देईल तेंव्हा आपण पण लोटांगण  घेऊ हे माझ पक्क होत. 

मागच्या महिन्यात संकेत म्हणजे माझ्या चुलत दीराचे लग्न झाल. आणि वैशाली काकूंनी मला विचारल की तू लोटांगण घेशील का? नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता पण आपल्याला जमेल का? ही शंका होती. शोभा काकूंनी घेतलेल लोटांगण धुसरसे आठवत होत. जेव्हा मी लोटांगण घेणार आहे, हे माझ्या माहेरी कळाले  तेंव्हा सगळेच खुप काळजीत होते. करोनाची पार्श्वभूमी, गावाकडची थंडी अणि माझी नाजुक तब्येतीमूळे  सगळे खुप काळजी करत होते पण माझा निर्णय पक्का आहे हे बघून मग सगळ्यांनी मला सपोर्ट करायला सुरुवात केली. 

दादा घरी प्रक्टिस कर म्हणाला आणि मी अतीउत्साह दाखवत घरातच लोळण घेतले... घरच्या smooth floor  वर जरी मस्त लोळण घेतले तरी कोपर,ढोपर अणि गुढगे कमालीचे दुखावले. लक्ष्यात आल की प्रकरण येवढेपण सोप्पे नही. 
मग सुरु झाल्या सगळ्यांच्या कळजीमय  सुचना , 
आई म्हणाली  तू जाड साडी नेस म्हणजे तुला काही टोचणार नाही 
बाबा म्हणाले तू kneecap अणि elbow protector  घाल.
पप्पांनी (सासरे) मंदिरात सतरंज्या घालायची तयारी दाखवली.
निशीने जोडीने लोटांगण घेऊया आसे सुचवाल, म्हणजे जर काही त्रास झाला तर दोघे मिळून सोसूया ही त्याची भावना होती.

सगळ्यांना माझी वाटणारी काळजी मला कळत होती पण करायचे तर जसे गावाकडे बाकीचे लोक करतात तसे करायचे, त्यात स्वताःच्या सोईसाठी कुठलाही बदल करायचा नाही आणि देव सगळ सांभाळून घेईलच हा विश्वास होता.
मग देवाला साकड घातल, मनापासुन प्रार्थना केली की आता तू सगळ संभाळून घे.

मनाची तयारी केली आसली तरी ऐनवेळ पोटात गोळा आला होताच. सगळ्या थोरांचे आशिर्वाद घेउंन, जसे जसे संगितल तस उपास, मौन पाळल. आता देवावर सगळ सोडून दिले होत.

गळ्यात हार घालून घ्यायला जरा अवघड्ल्यासारखे वाटत होत पण आता मौन सुरु होत, बोलू शकत नव्हते की मागे वळून बघणे शक्य नाही. तरी बर करोनामूळे वाजंत्री व गर्दीला फाटा दिला होता. 


मला वाटत होत की स्वत:च सगळ करायचे आहे, पण सगळा महिलवर्ग बरोबर होता. त्यानी घेतलेल्या कळजीमूळे सगळ फार सोपे झाल. आगदी फूला सारख जपून, गरज आसेल तिथे मला उचलून ठेवून त्यानी प्रदक्षिणापूर्ण करायला मोलाची मदत केली.त्या सर्वांचेच मनापासून आभार.

गावाकडच्या प्रथा,रुढी जरी अवघड असल्या आणि आत्ताच्या  काळात त्यावर विश्वास ठेवावा की नाही आसे वाटत आसताना त्या मागची भावना समजून घेणे महत्वाचे.
पाया पडणं, साष्टांग नमस्कार घालणं म्हणजे मनोभावे शरण जाणं, स्वाधीन होणं, सर्वस्व अर्पण करणं. आणि तेंव्हाच खरी मी- तूपणाची जाणीव नष्ट होते. हा अनुभव खुप वेगळा आणि चिरकाळ स्मरणात राहील.

~स्नेहल

Wednesday, February 5, 2020

नील आर्मस्ट्रॉंग

सालाबादप्रमाणे श्रावणातकरावयाची वारदशंकर पूजा काल संपन्न झाली.  नील जवळ बसून सगळं ऐकत होता. गुरुजींनी सांगितलं की कलशावर नवग्रह मांडले आहेत त्याची पूजा करा 
नील : नवग्रह म्हणजे 
मी : they are nine planets
नील : पण प्लॅनेट तर 8 आहेत.  Pluto is asteroid and not planet 
मी : 🙄🤐
  
आमच्या नील आर्मस्ट्रॉंग कडून अंतरीक्षाचे मला धडे घ्यायची गरज आहे 😅

Thursday, January 16, 2020

तो आणि मी, मी आणि तो

आत तो लवकरच येणार हे लक्ष्यात आल्या आल्या मनात लाडूच फुटले. त्याच्या येण्याची कायमच आतुरता असते, किती सुखद असतं त्याचे आस खूप दिवसांनी भेटणे, मीच काय माझे सगळे सखे सोयरे माझ्यासाठी त्याचे एवढे कौतुक करतातना कीं काय  सांगू तुम्हाला.

त्याचे येणं म्हणजे एक सोहळाच, फार दिवस माझ्या संपर्कात नसलेले सुद्धा तो आला की न विसरता जमेल तसं आमचं कौतूक करतात, तसा तो आहेच एकदम स्पेशल. 
त्याचे स्वागत पण जोरदार असते ड्रेस घालू की साडी ???माझी शॉपिंग तर आधीच झालेली असते. गोडा धोडाचे जेवण किती मज्जा . आनंदी आनंद.

पण तो भेटला ना की माझ्या मनाची नेहमी द्विधा अवस्था होते ... माझी माझ्याशीच तुलना सुरू होते
कशी आहे मी आता? मागे होते तशीच दिसते का मी अजून? की मागच्या वेळे पेक्ष्या जरा जाडच झाली आहे. 
वैचारिक पातळीत वाढ झाली आहे की आहे आजून तशीच आहे? छोट्या छोट्या गोष्टी मध्ये इगो कुरवाळत का बसते मी? आणि राग तो तर सेकंदात शूट होतो, पण आता मी नक्की सुधारेन हा. आणि सगळात महत्वाचं नक्की तब्येत सांभाळेन... पिंकी प्रोमिस( मागच्या वेळी पण मी त्याला हेच प्रोमिस केलं होतं) . पण माझा वाढदिवस, इतका चांगला आहे ना की तो नेहमी मला म्हणतो, "माझं परत भेटणे ही एक नवीन संधी म्हणून बघ अणि आपण परत भेटू तेंव्हा  तुझ्या अपडेटेड अँड बेटर व्हर्जन ला भेटू" 

काही वर्षांपूर्वी आजच्या दिवशी घेतलेला पहिला श्वास आणि त्या नंतर दरवर्षी तो आप्तजनांन बरोबर साजरा करायच सुख मिळतंय म्हणून देवाचे खुप खुप आभार. सलेब्रेशनच्या पद्धतीत दरवर्षी बदलत होत आहेत  पण आईच्या हातून औक्षण आणि मोठ्यांचे प्रेमळ आशीर्वाद  माझ्यासाठी लाख मोलाचं आहेत. 

बाकी उतू नये मातु नये, गिफ्ट्स ना कधी नाही म्हणू नये.

तुमची आपली,
स्नेहल 

Saturday, November 9, 2019

This Kid is difficult to handle

It was a sunday morning and I was forcing Neel to read his science book

ME: Neel are you able to follow the chapter? Do you need my help?
Neel: Science is easy mamma, I am difficult to handle
Me: Waahaat? Where did you get this dialogue from?
Neel: you only keep saying this kid is difficult to handle, I don't listen to you so I said so;-)

Saturday, November 2, 2019

मदर इंडिया

खूप दिवसा नंतर आज आम्ही शतपावली साठी बाहेर पडलो होतो. अर्थातच शेपूट बरोबर होतेच. मी आणि निशी काहीतरी बोलत असताना , नीलचे काहीतरी मध्ये मध्ये बोलणे सुरू होत . जन्मापासून सगळ्यांनी माझ्याच कडे लक्ष द्या अथवा मध्ये मध्ये नाक खुपसून मी माझ्याकडे ते ओढवून घेईनच आसा काहीसा बाणा आमच्या लेकाकडे आलाय. त्याची बोलण्याची पिरपीर सुरूच होती , ममा रोड वर चालू नको, ममा हे करू नको , ममा ते करू नको(चिडून मी कायम त्याला माझा अजेसासरा म्हणते). त्याला ऍडजस्ट करत माझे आणि नावरोबांची  काहीतरी कुरबुर सुरू होती आणि एका पॉइंटला आम्ही( स्वतःला आदरार्थी बोलावतेय) "फ"  वरून शिवी हसाडली. १०० हाका ऐकू जाणार नाहीत पण हळू आवाजातली ही गोष्ट निलोबांना बरोबर ऐकू गेली. लगेच माझा हात धरून मला थांबवून, एक भुवई वर करून चिरंजीवांनी माझी शिकवणी सुरू केली,

नील: ममा तू काय बोलली? which word did you say?
मी: माझ्यातली वैतागलेली महिला पेटून उठली,मी म्हणाले आधी आई बाबानी मला कंट्रोल केलं, मग सासू सासरे आता तू पण मला कंट्रोल करतोय. please leave me alone and let me live my life peacefully.
नील: If I leave you , who will take care of me?
मी:  you just stop controlling me, that's none of your business
नील: Getting angry , It is other way, you too stop controlling me, it is none of your business too
मी: See Neel , till you become 18 years old, you are totally my business. Then I will let you go wherever you want
नील: अर्ये पण मी तुला सोडून कुठे जाणारच नाही. मग तू अजेसासरा कुणाला म्हणणार?

मदर इंडियाचा उर भरून यायला हे निमित्त खूप झालं नाही?
चिडलेल्या मला कायम शांत करायची आणि त्याच्याकडे मायेने बघायला लावायची चांगली कला त्याच्याकडे आहे.